कोळंबे येथील क्रशरविरोधात उपोषणाचा इशारा
संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबे येथे गेली वर्षभर सुरू असलेल्या अनधिकृत मोबाईल क्रशरविरोधात वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी केला आहे. या क्रशरवर कारवाई न केल्यास केल्यास दि.11 जुलै रोजी उपोषण आंबेड येथे उपोषण करणार असल्याचा इशारा रमजान गोलंदाज यांनी दिला आहे. महामार्ग क्र.66 ला लागून ग्रामपंचायत हद्द कोळंबे येथे असलेला अनधिकृत क्रशर सुरू आहे. आंबेड ते मानसकोंड येथे जोरदार विनापरवाना बोरवेल ब्लास्टिंग केले जात असून त्याचे हादरे परिसरातील घरांना बसत आहेत. याबाबत माहितीच्या अधिकारात महसूल विभागाकडून माहिती मागवली असता त्यांनी कोळंबे येथे सुरु असलेल्या क्रशरला कोणतीच परवानगी नसल्याचे लेखी कळवले आहे.