
शिंदेंना समर्थन?: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरप्रमुखांना विचारला जाब
चिपळूण : शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. त्याबाबत शिवसैनिकांनी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत थेट विचारणा केली. शहरप्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असेही नमूद केले. एका जबाबदार पदावर काम करत असताना अशी प्रतिक्रिया देणे योग्य आहे का? असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला तेव्हा ती माझी वैयक्तिक भूमिका होती. महापुराच्या वेळी त्यांनी चिपळूणसाठी मदत केली होती. त्यामुळे मी प्रतिक्रिया दिली होती. मी पक्षाबरोबरच राहणार असल्याचे उमेश सकपाळ यांनी यावेळी नमूद केले.