रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस

रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारीही मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेेधशाळेच्या अंदाजानुसार 27 जून 2022 पर्यंत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोकण किनारपट्टी भागासह गोवा किनारी ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे. मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार तर अन्य विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button