
मंथन परीक्षेत देवरूख-किरदाडीतील सार्थक चव्हाण राज्यात चौथा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी येथील ग्रामीण भागात शिकणार्या सार्थक चव्हाणने मंथन परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला. शहरांमध्ये असणार्या कोणत्याही क्लासेस वा इतर सुखसोयींशिवाय त्याने मिळविलेले यश हे खूपच अभिमानास्पद ठरत आहे. मंथन वेलफेयर फांऊडेशनमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. सार्थक मकरंद चव्हाण याने जि.प. पू.प्रा.मराठी शाळा किरदाडी येथून हे यश मिळवले. इयत्ता पहिलीत 150 पैकी 144 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक त्याने मिळवला आहे. या यशाबद्दल त्याचेे कौतुक होत आहे.