
पावसाला सुरूवात झाली नाहीत तोच रत्नागिरी शहरातील गुळगुळीत रस्त्यांवरील खड्डय़ांनी डोके वर काढले
जून महिन्यात पावसाने अद्यापही जोर धरला नसून आत्ताकुठे दोन दिवसांत पावसाला सुरूवात झाली आहे गेले काही महिने रत्नागिरी शहरातील रस्ते गुळगुळीत तुळतुळीत करण्यात आले होते मात्र पहिल्या पावसाच्या काही सरी पडताच शहरातील गुळगुळीत रस्त्यांवरील खड्डय़ांनी डोके वर काढले आहे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर भागांतील सर्कलमधील रस्त्यावर खड्डे आता दिसू लागले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या शहराचा भाग खचल्यामुळे भर रस्त्यातच ओहोळ तयार झाले आहेत त्यामध्ये पाणी साठल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना पाण्याचा अभिषेक होत आहे त्यामुळे अजूनही पूर्ण पावसाळ्यात रस्त्यावरील किती खड्डे डोके वर काढणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
www.konkantoday.com

