पालशेतच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

गुहागर : सांस्कृतिक कार्यक्रम, जुन्या आठवणींना उजाळा, वर्गमित्रांच्या मुलाखती अशा वातावरणात रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथील दहावीच्या 1988 बॅचच्या विद्यार्थ्यांचे 4 थे स्नेहसंमेलन पार पडले. गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथील शांताई रिसॉर्ट येथे झालेल्या या कार्यक्रमाला अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. शालेय जीवनातील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला निधन झालेल्या चार मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परेश नागे, विलास देवळे, सत्यजित गुढेकर आणि पुष्पलता विचारे यांच्या आठवणींना उजाळा देऊन या सर्वांना सर्व वर्गमित्रांनी श्रद्धांजली वाहिली. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजीचे आणि पी. टी.चे तत्कालीन शिक्षक रामचंद्र सपकाळ, मराठीच्या शिक्षिका उर्मिला बुरशे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन झाले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वच वर्गमित्रांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र झिंबर, नीता कीर, सुनिता आरेकर यांनी केले. रमेश आंबेकर आणि प्रमोद मांडवकर यांनी त्यांना सहकार्य केले. स्वागत गीत धनिता बिर्जे हिने सादर केले. राजेंद्र झिंबर, लिना सावंत, मिलिंद विचारे यांनी वर्गमित्रांच्या मुलाखती घेतल्या. सुधीर भायनाक यांनी नव्वद जणांचे फोटो जमवून त्यांचे बॅनर बनवून आठवणींना उजाळा दिला. भारती झिंबर, सुनिता गोरिवले, अलका तांबे आणि निता कीर यांनी फुगडी डान्स सादर केला.
शेवटी सर्व वर्गमित्रांनी जल्लोष गीतावर ठेका धरला. राष्ट्रगीत म्हणून संमेलनाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button