
राज्यात ठिकठिकाणी बांबू क्लस्टर निर्माण होणार
केंद्र शासनाने देशातील नऊ राज्यात बांबू क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश असल्याने राज्यात ठिकठिकाणी बांबू क्लस्टर निर्माण होणार आहेत. त्या माध्यमातून कोकणातही ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून ही योजना आली आहे. बांबूच्या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी बांबू क्लस्टर योजना आखण्यात आली आहे.शेतकर्यांना नवा स्रोत निर्माण होऊन स्थानिक उद्योगांचे जतन व्हावे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रप्रमाणेच गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा, आसाम, नागालँगड, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यातील 22 ठिकाणी बांबू क्लस्टर निर्माण केले जाणार आहे.
www.konkantoday.com