
किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक, पॅरासेलिंग व अन्य सागरी जलक्रीडा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिले
नुकतेच काही दिवसांपूर्वी दिवाळी कालावधीत जिल्हाधिकार्यांच्या सशर्त परवानगीने सुरू करण्यात आलेले किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक, पॅरासेलिंग व अन्य सागरी जलक्रीडा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांत खळबळ उडाली असून, बंदर विभागाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
बंदर विभागाच्या या भूमिकेमुळे मालवणात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेक पर्यटकांना किल्ले दर्शन व सागरी जलक्रीडांचा आनंद न लुटताच माघारी परतावे लागले. कोरोना लॉकडाऊन काळात सर्वकाही ठप्प होते. मात्र, कोरोना संक्रमण कमी झाल्याने शासनाने अनलॉक प्रक्रियेत अटी-शर्तींसह अनेक व्यवहार, सेवा सुरू केले हाेते
www.konkantoday.com