
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान, मध्य प्रदेशातील मंत्र्यांच्या विरोधात FIR दाखल.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १५२, १९६(१)(b), आणि १९७(१)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जबलपूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि पोलिस महासंचालकांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.