एसटी बसेस टायर नसल्याने आगारातच उभ्या
खेड : खेड आगारात 10 ते 20 गाड्या टायर अभावी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील फेर्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील फेर्या रद्द होत असल्याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसत आहे. रत्नागिरी येथील टायर प्लान्टला रबर पुरवठा करणार्या कंपनीकडून रबरचा पुरवठा न झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि रायगड विभागातील शेकडो गाड्या टायरअभावी उभ्या राहिल्या आहेत. याचा फटका शाळेतील विद्यार्थी, नोकरदार वर्गाला बसत आहे. ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रबर पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.