![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2022/06/IMG-20220622-WA0021.jpg)
मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा; 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : मिरजोळे येथे ग्रामीण पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून एकूण 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
72 हजारांची 48 लिटर गावठी दारू, इतर साहित्य आणि 3 दुचाकी यांचा यात समावेश आहे. बुधवार दि. 22 जून रोजी सकाळी 7.30 वा. ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पाटील, अमोल पाटील, संतोष सकपाळ (सर्व राहणार मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस नाईक राहुल पावसकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, सहायक पोलिस निरीक्षक शेळके, पोलिस नाईक पावसकर, कदम, गायकवाड, पोलिस हवालदार वाझे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, कांबळे यांनी केली.