ट्रव्हल्स कंपनीच्या सेमिनारमध्ये आमिष दाखवत प्रौढाची फसवणूक
रत्नागिरी : ट्रॅव्हल कंपनीच्या सेमिनारमध्ये देश-विदेशात फिरण्याचे आमिष दाखवून प्रौढाची 1 लाख रुपये उकळून फसवणूक केली. या प्रकरणी 10 ते 12 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत आणि त्याच्या 11 अज्ञात साथिदारांविरोधात हा गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात डी.एस.चंद्रशेखर (वय 52, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 28 मे 2022 रोजी दुपारी 1 वा. भाटये येथील कोहिनूर बीच रिसॉर्ट येथे व्हॉस्कॉन रिअल इस्टेट अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमार्फत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संशयितांनी वर्षातून एकदा 6 रात्री 7 दिवस देश-विदेशात फिरण्यासंबंधी माहिती दिली. तसेच या स्कीमच्या मेंबरशिपसाठी डी.एस.चंद्रशेखर यांच्याकडून 1 लाख रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. परंतु, मेम्बरशिपचा फायदा घेण्यासाठी चंद्रशेखर यांनी कंपनीच्या हेल्पलाईन आणि मोबाईल नंबरवर संपर्क केला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर करत आहेत.