पिंपळी येथील कॅनॉलमध्ये तरूण बुडाला
चिपळूण : पिंपळी परिसरातील कॅनॉलमध्ये 22 वर्षीय तरूण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कार रवींद्र सावंत (वय 22, पेढांबे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संस्कार हा खेर्डी परिसरात एका कंपनीमध्ये कामाला होता. पिंपळी परिसरातील कॅनॉलमध्ये त्याने उडी मारल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती पिंपळीसह पेढांबे परिसरातील स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी संस्कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सापडला नाही. दरम्यान या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते व पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत संस्कारचा शोध सुरू होता.