रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत टायरअभावी तब्बल ९० गाड्या उभ्या

.खुद्द परिवहनमंत्री ऍड. अनिल परब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील रत्नागिरी कार्यशाळेतील नव्वद गाड्यांना टायरच उपलब्ध होत नसल्याची माहिती हाती आली आहे कोरोना संकटानंतर व एसटीच्या संपानंतर सावरत असतानाच जिल्ह्यातील एसटीवर ही वेळ आली आहे. टायर उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील ९० बसेस विभागीय कार्यशाळेत उभ्या आहेत. एका बाजूला एसटीचे विस्कळीत झालेले वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी कसरत सुरु आहे. त्यात शाळा सुरु झाल्याने एसटीच्या मागणीत वाढ होत असताना एसटी पुढे टायर तुटवड्याचे नवे संकट उभे आहे.
शहरी भागात २०१९ ला ४३ फेर्‍या सुरू होत्या. आता पुन्हा ४० फेर्‍या पूर्ववत झाल्या आहेत. विद्यार्थी संख्येनुसार काही मार्गावर फेर्‍या वाढवण्याचे काम सुरू आहे. एसटीला मागणी वाढताना टायरचा मोठा तुटवडा भासत असल्याने मागणी तसा पुरवठा करताना एसटीची दमछाक होत आहे. विभागीय कार्यशाळेत टायरअभावी तब्बल ९० गाड्या उभ्या आहेत. त्याचा एसटी वेळापत्रकावर परिणाम होऊ लागला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button