
भोस्ते घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनर उलटला
खेड : भोस्ते घाटात रासायनिक पावडरची वाहतूक करणारा कंटेनर ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर उलटला. यात चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. रस्त्यावर उलटल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. हा अपघात दि. १४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. चालक जसबीरसिंग (३६, रा.शांगला, होशियारपूर, पंजाब) हा कंटेनर (एमएच०४ एफ जे ९२२१) घेऊन न्हावा शेवा बंदरात जात असताना भोस्ते घाटातील अवजड वळणावर ब्रेक फेल झाले. चालकाचा ताबा सुटून ट्रेलर उलटला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एकदिशेने वाहतूक सुरळीत सुरू केली.