
मनसे पदाधिकारी व सैनिकांनी संघटीतपणे कार्य करावे : अमित ठाकरे
रत्नागिरी : कोणतेही गटातटाचे राजकारण न करता पदाधिकारी व सैनिकांनी संघटीतपणे कार्य करावे, असा सल्ला अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मनसेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे गुरुवारी रत्नागिरीत होते. या दौर्यात त्यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांचा पक्षप्रवेश झाला. नूतन तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी रत्नागिरीतील त्यांच्या दौर्याचे आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे योग्य नियोजन केले होते. मनविसेच्या राजापूर आणि लांजातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. यानंतर झालेल्या बेसिक संघटना पदाधिकार्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केल्याने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. रत्नागिरीतील गोगटे कॉलेज विद्यार्थी सेना युनिटचेही उद्घाटन त्यांनी केले. जिल्हा संपर्कअध्यक्ष सतीश नारकर, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस सुनील साळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दौर्याचे यशस्वी नियोजन केले.