कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण,20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण
महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा दि 20 जून 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगलुरु येथून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करतील.
कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि ऊडपी या तीन ठिकाणी या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. सोमवारी दुपारी 2:20 वाजता हा कार्यक्रम होत आहे.
यामुळे कोकण रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे कोकण रेल् वे चे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री असताना या कामी मोठा पुढाकार घेतला होता
www.konkantoday.com