
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा रत्नागिरी दौरा; विविध उपक्रमांत सहभाग, योजनांचा आढावा.
रत्नागिरी, दि. ११ :* राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत शनिवार १२ जुलै व रविवार १३ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून, यावेळी त्यांचा वेळापत्रक विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासनिक आणि विकासात्मक कार्यक्रमांनी भरलेला आहे.
शनिवार, १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता डॉ. सामंत कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल होणार असून, तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात आगमन आणि थोडा विश्रांती वेळ राखीव आहे.
सकाळी १० वाजता ते दामले विद्यालय येथे आयोजित छत्री वाटप कार्यक्रमात सहभागी होतील.
यानंतर सकाळी ११ वाजता रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत लाड-पागे समितीमधील सफाई कामगारांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, डॉ. सामंत त्यासाठी नगर परिषद सभागृहात उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वाजता ते पावस्करवाडी (ता. संगमेश्वर) येथे मोटारीने प्रयाण करतील.
दुपारी १ वाजता बळीराजा वाढावेसराड आणि शिवसेना तालुका संघटना संगमेश्वर यांच्यातर्फे आयोजित भात लावणी व सामूहिक नांगरणी स्पर्धांचे उद्घाटन ते करतील.
यानंतर दुपारी २ वाजता ते पुन्हा रत्नागिरीकडे प्रयाण करतील.
दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात CMEGP व PMEGP योजनांच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ३.४५ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, ४.३० वाजता धर्मवीर संभाजी महाराज स्मारक सादरीकरण, आणि सायंकाळी ५.३० वाजता ‘चवीका’ चहा स्टॉल वाटप कार्यक्रमात ते सहभागी होतील.
सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथे प्रभाग क्रमांक ५ मधील नूतन सभागृहाचे उद्घाटन व दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे.
रात्री ७.३० वाजता विठ्ठल मंदिर विकासकामांसंदर्भात शासकीय विश्रामगृहात बैठक होणार असून, त्यानंतर रात्री विश्रामासाठी ते तेथेच थांबणार आहेत.
रविवार, १३ जुलै रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पाली येथील निवासस्थानी त्यांचा वेळ राखीव असून, दुपारी ३ वाजता रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात (स्थळ : कित्ते भंडारी हॉल, बंदर रोड) ते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत माळनाका येथील एसटी महामंडळाच्या विश्रामगृहात राखीव वेळ असून, रात्री १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकातून कोकणकन्या एक्सप्रेसने (गाडी क्र. २०११२) ते मुंबईकडे प्रयाण करतील.