दिव्यांग मंदार आगरेने दहावीत मिळवले ७९ टक्के

आरएचपी फाउंडेशनचा सभासद
फाउंडेशनने केले मार्गदर्शन, प्रशिक्षण
आइस्क्रिमच्या काड्यांपासून बनवतो वस्तू

रत्नागिरी
रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा (आरएचपी) सभासद मंदार रमेश आगरे (रा. तुळसणी, ता. संगमेश्वर) हा मार्च २०२२ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी परीक्षेमध्ये ७९ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याबद्दल त्याचे आरएचपी फाउंडेशनतर्फे अभिनंदन करण्यात आले.

मंदारचा पाच वर्षापूर्वी 2017 साली इयत्ता आठवीत असताना दुचाकीवरून जाताना पडल्याने अपघात झाला होता. त्यानंतर दोन वर्ष तो सर्वसामान्य जीवन जगत होता. काहीच त्रास होत नव्हता. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये इयत्ता दहावीत असताना कबड्डी खेळायला गेला होता. खेळून घरी परत आल्यावर दोन दिवस ताप आला आणि हळुहळु कमरेपासून ताकद कमी कमी होत गेली. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. कमरेपासुन खाली काहीही संवेदना जाणवत नाहीत. तो पॅराप्लेजिक असुन व्हीलचेअर बाउंड आहे. त्यावेळी त्याला हॉस्पीटलमधे ॲडमीट असल्याने इयत्ता दहावीची परीक्षा देता आली नव्हती. यावर्षी मंदारने जिद्दीने घरी बसून अभ्यास करून १० वीची परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळविले. त्यामुळे त्याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

अपंगत्व आल्यानंतर कमरेखाली संवेदना नाहीशा झाल्या. पण मंदारने जिद्दीने आइस्क्रिमच्या काड्यांपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवायला सुरवात केली. पक्षी, प्राणी, जहाज, इमारत, मंदिर यासह विविध प्रकारचे शो पीस तो साकारतो, हे विशेष आहे.

मंदारने युट्युबवर पाहुन पॅराप्लेजीक पेशंट कसे बेडवर, व्हीलचेअरवर बसतात ते पाहुन शिकला. कोणाकडुनही विशेष प्रशिक्षण न घेता स्वत: स्वत:चे करायला शिकला, याचे खरंच खुप कौतुक आहे. एवढे पराकोटीचे अपंगत्व येऊनही रडत न बसता लढायला शिकला. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे यांनी मंदारच्या घरी जाऊन त्याची सर्व माहिती घेतली. त्याच्या दहावीतील यशाबद्दल अभिनंदन केले.

त्याला पॅराप्लेजीक रुग्ण स्वत: पोट कस साफ करतात, युरीन इन्फेक्शन होऊ नये, बेडसोअर होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यायची? बेडवरुन व्हीलचेअरवर आणी व्हीलचेअरवरुन कमोडवर कसं शिफ्ट व्हायचे? व्हीलचेअर पायर्‍यांवरुन कशी चढवायची, उतरावयाची? नाष्टा, जेवण, झोपणे, उठणे, व्यायामाच्या वेळा ठरविणे याविषयी सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण देऊन आले. अपंगत्वाचा दाखला, एसटी पास, रेल्वे पास, युनिक आयडी, शासकीय योजना, दिव्यांग निधी याविषयी माहिती आणि आवश्यक कागदपत्र या विषयी पूर्ण माहिती दिली. मंदारला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन आरएचपी फाउंडेशनने मोलाची मदत मंदारला केल्याबद्दल आगरे कुटुंबियांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button