
दापोली बुरोंडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
दापोली : तालुक्यामध्ये बुरोंडी हुसेनपुरा मोहल्ला येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना शुक्रवार 17 जून रोजी सकाळी 9 ते 12:30 वा. या दरम्यान घडली. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने दापोली पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार तिची मुलगी बुरोंडी एसटी स्टँड शेजारी हुसेनपुरा मोहल्ला या ठिकाणी कुटुंबासोबत राहत होती. 17 जून रोजी सकाळी घरी अन्य कोणी नसताना अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील करीत आहेत.