
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी सोरकोळी डोहात पोहायला गेलेल्या प्रौढाचा बुडुन दुर्दैवी मृत्यू
पोहायला गेलेल्या प्रौढाचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी सोरकोळी डोहात साेमवारी दुपारी ३.३५ वाजण्याच्या दरम्याने घडली आहे. कासारकोळवण येथील संजय तुकाराम करंबेळे (५०, रा. कासारकाेळवण) असे मृत्यू झाल्याचे प्राैढाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद प्रवीण जयराम डाफळे (३४, रा. कासारकोळवण, डाफळेवाडी) यांनी दिली आहे. प्रवीण आणि संजय हे दोघे सोमवारी दुपारी बावनदी पात्रात पोहायला गेले होते. आंगवली येथील बावनदी सोरकोळी डोहात पोहत असताना संजय करंबेळे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते डोहात बुडू लागले हे लक्षात येताच प्रवीण डाफळे याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत पाण्याच्या बाहेर काढले.बेशुध्द अवस्थेत असताना संजय यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांनी तपासणी करून मृत घोषित केले
www.konkantoday.com