देवरूखमध्ये जुळ्या भावांनी दहावीत पटकावले प्रथम आणि द्वितीय क्रमांक

देवरूख : येथील पाध्ये इंग्लीश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे सुजल पवार व तन्मय पवार या जुळ्या भावांनी प्रशालेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटाकवले आहेत. सुजल सुनिल पवार याने ९८.८०% व तन्मय सुनिल पवार याने ९८.६०% गुण मिळवले आहेत. या दोघांना अभ्यासाबरोबरच नृत्याचीही आवड आहे. या जुळ्या भावांचे देवरूख परिसरातून विशेष अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button