भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या खंड प्रकाशनाचा कार्यक्रम 21 जूनला
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंड प्रकाशनाचा कार्यक्रम 21 जूनला रत्नागिरीत होणार आहे. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यावर रिसर्च करता येईल, असा हा खंड आहे. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या मुलासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली. शहरातील जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, एकूण सहा खंड आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील खंड प्रकाशनाचे रत्नागिरीत नियोजन करण्यात आले आहे. विद्यालय, महाविद्यालयात रिसर्च होईल असे हे खंड
आहेत. या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, त्यांचा मुलगा, पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ना. सामंत यांनी केले.