20 वर्षे कारावास; 37 हजारांचा दंड; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या चांदेराईतील तरुणाला शिक्षा

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला लग्‍नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या चांदेराई येथील आरोपीला न्यायालयाने गुरुवारी 20 वर्ष कारावास आणि 37 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संदेश सुरेश गुरव (वय 27, राहणार चांदेराई, तालुका रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली होती.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून 11 साक्षिदार तपासले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून संजीवनी मोरे, सुनील आयरे यांनी काम पाहिले.
संदेशविरोधात पीडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, संदेश गुरव पीडितेच्या घरी जायचा. विवाहित असूनही संदेशने पीडितेला लग्‍नाचे आमिष दाखवले. यातून तिच्यावर 2020 साली सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अत्याचार केला. ‘मी तुझ्याशी लग्‍न करणार नाही’ असे सांगत पीडितेला व तिच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गुरुवारी 16 रोजी या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्‍त विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपी संदेश गुरवला शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button