साखरोळी येथून तरुण बेपत्ता
दापोली : तालुक्यामधील साखरोळी शिरीन फार्म येथून जमनालाल लोहिया हा 36 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिस ठाण्यात राजेश बनगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जगनलाल लोहिया (मूळचा सुपर, तालुका कपासन, जिल्हा चित्तोडगड, राज्य राजस्थान) येथील रहिवासी आहे. सध्या शिरीन फार्म साखरोळी येथे होता. लोहिया हा मतिमंद असून शिरिन फार्म साखरोळी येथून दिनांक 14 जून रोजी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला तो अद्याप परतलेला नाही. त्याचा परिसरात शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहे.