
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीला भेट
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आज रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीला भेट दिली. तौक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मिरकरवाडा जेट्टीला भेट देऊन तेथील मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे बाबामिया मुकादम आदींनी मच्छिमारांच्या समस्या पटोले यांच्यासमोर मांडल्या यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई, माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, कॉंग्रेस नेते अविनाश लाड, माणिकराव जगताप, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश चिटणीस रमेश कीर, अशोकराव जाधव, राजिवडा मच्छिमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर, जय हिंद मच्छिमार सोसायटीचे आयरे, कोकण विभागीय फिशरमन कॉंग्रेसचे मार्तंड नाखवा, आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com