मुलाचे लग्न ठरत नसल्याने आईची आत्महत्या; सडे जांभारी गावातील प्रकार

गुहागर : मुलाचे लग्न ठरत नसल्याने नैराश्येतून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे घडली आहे. भागिर्थी गोविंद आंबेकर असे या वृध्द महिलेचे नाव आहे. आंबेकर या सोमवारी 13 जून रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वा. झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. भागिर्थी, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. गुहागर पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button