
राज्य सरकारने वादग्रस्त ठरलेल्या कप सिरफ ‘कोल्ड्रिफ’वर बंदी घातली
महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोगाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने वादग्रस्त ठरलेल्या कप सिरफ ‘कोल्ड्रिफ’वर बंदी घातली आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात समोर आला होता. यानंतर इतर राज्यांमध्ये असा काही प्रकार समोर येत होता. संबंधित प्रकरण हे सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. या प्रकरणी चिमुकल्या मुलांच्या आरोग्याशी कोणताही धोका उद्भवू नये यासाठी राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने संबंधित औषधावर बंदी घातली आहे.
महाराष्ट्रात कोल्ड्रिफ सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. या सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 18 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याने या वादग्रस्त औषधावर बंदी घातली आहे.
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टोल फ्री नंबर जारी केला आहे. कोणत्याही औषधांच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये कोल्ड्रिफ सिरप आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर फोन करुन माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे




