ऑफिसमध्ये मिटींग असल्याचा फोन आला आणि त्या गडबडीत ‘कुंभार्ली’त झाला अपघात…मृत अभियंत्यावर गुन्हा दाखल
चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी मृत अभियंता शंकरराव दिनकरराव भिसे (वय 56) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अभियंता शंकर भिसे व सहप्रवासी अश्विनी दिग्विजय रासकर (रा. मंगळवार पेठ, सातारा) हे कराडहून चिपळूणकडे येत होते. ते पोफळी येथे आले असता भिसे यांना त्यांच्या ऑफिसमध्ये मिटींग असल्याचा फोन आला. म्हणून ते परत पोफळीहून कराडच्या दिशेने कुंभार्ली घाटातून निघाले. कराडकडे जात असताना गाडी घाटामध्ये अतिवेगाने चालविल्यामुळे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला आणि एका वळणावर गाडी दरीत जाऊन कोसळली. यामध्ये सहप्रवासी महिला जखमी झाली असून त्यांनी शिरगाव पोलिसात खबर दिली.