रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कादांटी खोऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाकडे गेल्या वर्षभरात पूर्णपणे लक्ष देणे सार्वजनिक बांधकाम विभागाला जमलेले नाही.
परिणामी गतवर्षीच्या अतिवृष्टीत ढासळू लागलेल्या या घाटातील वाहतूक यंदा सुरक्षित सुरू ठेवण्याचे आव्हान यावर्षी पावसाळ्यात प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कादांटी खोऱ्यातील अनेक गावांना पावसाळ्यात शहराशी जोडणारा हा घाट आहे. मात्र, गतवर्षी घाटाची झालेली पडझड अद्याप पूर्णपणे दुरुस्त झालेली नसल्याने स्थानिक ग्रामस्थ चिंतेत आहेत.खेड तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणारा रघुवीर घाट निसर्गरम्य ठिकाण असून, कादांटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, मोरणी, अकल्पेसह २१ गावांमध्ये पोहोचण्यासाठी दळणवळणाचे हे एकमेव माध्यम आहे
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या पश्चिम घाटाला जोडणाऱ्या रघुवीर घाटाकडे गेल्या वर्षभरात सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष