
मद्यपान करून एसटीच्या ड्युटीवर याल तर नोकरीला मुकाल
एसटीच्या फेरीपूर्वी चालक-वाहकांची मद्य प्राशन तपासणी कठोर करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.सर्रास मद्य प्रशासन करून चालक-वाहक बसेस रस्त्यावर काढत असून, त्यामुळे प्रवाशांचा जीवाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे डेपो स्तरावर मद्य प्राशन तपासणी करण्यासाठी देण्यात आलेल्या मशीनचा वापर करून, दैनंदिन चालकांची फेरीपुर्वी तपासणी करण्याच्या सूचना असून मद्य प्राशन करून एसटी कर्मचारी आढळल्यास पोलिस तक्रार करून सेवेतून बडतर्फीची कारवाई सुद्धा केले जाणार आहे.
एसटी मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार कामगिरीवर जाणा-या चालक,वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच बस फेरीसाठी सोडण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील वाहतूक नियंत्रकांना दिल्या आहे. अपघाताच्या गंभीर घटना टाळण्याकरिता या आदेशांची कठोर अंमलबजाणी व्हावी यासाठी एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. दरम्यान एसटी कर्मचारी मद्यप्राशन करून आढळल्यास, स्थानक किंवा आगार प्रमुख यांना माहिती देत संबंधीत एसटी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करून पोलीस फिर्याद करण्याचे विभाग नियंत्रकांना सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com