
जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी अशी भावना व्यक्त करीत सिंधुदुर्गातील कुडाळ येथे पुरुषानी केली वटपौर्णिमा साजरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मंगळवारी पुरूष मंडळींनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली. अगदी महिलांप्रमाणेच या पुरूष मंडळींनी वटवृक्षाची पूजा करून वटवृक्षाला सात फेर्या मारल्या.त्याचबरोबर जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, तिला निरोगी, दीर्घ आयुष्य लाभावे, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र महिला वर्गाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि प्रतिष्ठित स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविला जात आहे. संसाराच्या रहाटगाड्यात पुरुषाला समर्थपणे साथ देणाऱ्या पत्नी प्रति श्रद्धा भाव व आदरभाव व्यक्त करण्यासाठी, पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये आणि संसारामध्ये स्त्रियांच्या सहकार्याचा वाटा मोठा आहे. याची जाणीव ठेवून ही वटपौर्णिमा पुरूष मंडळींनी साजरी केली.
www.konkantoday.com