रत्नागिरी आता ऑटोरिक्षाचा प्रवास महागणार
पेट्रोलच्या दरवाढीनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी ऑटोरिक्षाची भाडेवाढ जाहीर केली. रत्नागिरी शहरामध्ये पहिल्या 1.6 किमीच्या टप्प्यासाठी 31 रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठीही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे.यापूर्वी 4 सप्टेंबर 2018 रोजी ऑटोरिक्षाचे भाडेदर निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या 1.6 किमीच्या टप्प्यासाठी 27 रुपये आणि पुढील प्रत्येक टप्प्यासाठी 17 रुपये 70 पैसे दर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर पेट्रोलचे दर वाढत गेले. त्यामुळे 10 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवीन भाडेदर जाहीर केला आहे.
ऑटोरिक्षाचा प्रतिकिलोमीटर भाडेदर 20 रुपये 49 पैसे राहणार आहे. पहिल्या 1.6 किमीसाठी 31 रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यासाठी प्रतिकिलोमीटरप्रमाणे भाडे आकारले जाईल. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत 50 टक्के अतिरिक्त भाडे आकारले आणार आहे. सामानाकरीता 3 रुपये दर आकारण्यात येणार आहे.
www.konkantoday.com