
ईगल इन्फ्रासह सल्लागार कंपनीला नोटीस
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूूूूूूूूूूूूूूूूूूूल दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कंत्राटदार कंपनी ईगल इन्फ्रासह सल्लागार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात दुर्घटनेच्या कारणाचा तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली केंद्रीय तज्ज्ञ चौकशी समिती येत्या २ दिवसात येथे दाखल होणार आहे.
उड्डाणपूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे येथील बहाद्दूरशेखनाका येथे भेट देऊन मुंबई-गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. www.konkantoday.com