खेड नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर
खेड : नगर परिषदेची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणुकीकरिता सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवार दिनांक १३ रोजी दुपारी १२ वाजता नगर परिषदे सभागृहात पालिकेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी काढून आरक्षण जाहीर केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी हे आरक्षण जाहीर केले. प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग १-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग २- अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ३-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ४-अ अनुसूचित जाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ५- अ-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग६-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ७- अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ८-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ९-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग १०-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण असे आहे.