
कंपनीत कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला तरूण बेपत्ता
दापोली : तालुक्यातील इनाम पांगारी येथून तीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना 12 जून रोजी घडली. दापोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मनीष अविनाश काष्ट्ये हा सकाळी 11 वा. च्या सुमारास शिरशिंगे येथील मेहता इंडस्ट्रीज येथील बिस्लरी कंपनीमध्ये जात आहे, असे घरी सांगून गेला. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याची सर्वत्र नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो कुठेच न आढळल्याने 13 जून रोजी दापोली पोलिस ठाण्यात त्याचे वडील अविनाश काष्ट्ये यांनी खबर दिली.