भरणे येथील अनिकेत स्पोर्टस् क्लबच्या महिला संघाने कबड्डीत पटकावले अजिंक्यपद

खेड : जय भवानी व्यायाम मंडळ, सांगली यांच्या वतीने दि.1 ते 3 जून या कालावधीत राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन माधवनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवशक्ती मुंबई शहर या कबड्डीतील दिग्गज संघावर मात करत अनिकेत स्पोर्टस् क्लब भरणे-खेड या संघाने अजिंक्यपद पटकावले. या संघातील खेळाडूंचा शनिवारी दि. 4 रोजी खेडमध्ये संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघात कर्णधार कुमारी सायली शिंदे हिच्यासोबत सिद्धी चाळके, तस्निम बुरोंडकर, समरीन बुरोंडकर, प्रतीक्षा चव्हाण, भूमी थोरे, वंशिता मोरे, पूर्वा मोरे, पूर्वा दळवी, श्रावणी जाधव या खेळाडूंचा समावेश होता. अनिकेत स्पोर्टस, भरणे या संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठान मुंबईचा 47 – 18, तरूण मराठा सांगली 25 – 12 , शिव ओम पुणे 20 – 18, सोलापूर 32 – 14 या गुण फरकाने मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशक्ती, धुळे या संघावर 37 -12 असा एकतर्फी विजय मिळवला. अंतिम सामना बलाढ्य अशा शिवशक्ती मुंबई शहर या संघाबरोबर झाला. अटीतटीच्या सामन्यात 25-23 अशा 2 गुणाच्या फरकाने जिंकत अंतिम विजेतेपद भरणे संघाने प्राप्त केले.
प्रशिक्षक सुजित फागे व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समरीन बुरोंडकर तसेच सर्व संघ सहकारी यांचा खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कर्णधार सायली शिंदे हिने उत्तम खेळ करत आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले. क्रीडा मार्गदर्शक दाजी राजगुरु, समद बुरोंडकर व विलास बेंद्रे, सुभाष आंबेडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष व चिपळूणचे आमदार शेखर निकम, सतीश चिकणे, मंगेश मोरे, संजय दरेकर, विलास शिंदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.सत्कारावेळी ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक दत्ताराम पारकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button