काळबादेवी येथील बोटीवर काम करणार्या वृध्दाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथील बोटीवर खलाशी म्हणून काम करणार्या वृध्दाच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष्णू लक्ष्मण पारकर (वय 65, रा. मूळ आंबूळगड, राजापूर सध्या रा. काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. याबाबत अमृत दत्ताराम मयेकर (रा. काळबादेवी पारकरवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, विष्णू पारकर हे अमृत मयेकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते. शनिवार 11 जून रोजी पारकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याचा अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.