
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या इंजिनिअरची पंख्याला गळफास लावून आत्महत्या
लांजा : मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या ठेकेदार कंपनीत काम करणार्या इंजिनिअरने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लांजा रेस्ट हाऊस परिसरात घडली आहे. शुक्रवार दि. 10 जून रोजी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल येथील भानूदास सोमनाथ दास (वय 33) हा मेटालिक या कंपनीमार्फत महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी इंजिनियर म्हणून काम करत होता. शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात भाड्याची रुम घेऊन राहत होता. त्यांच्यासोबत सुपरवायझर म्हणून काम करणारा सौरभकुमार साईन हा शुक्रवारी 10 जून रोजी दुपारी भानुदास यांना मोबाईलवर फोन करत होता. मात्र, त्याने फोन न घेतल्याने सौरभकुमार हा त्याच्या राहत्या घरी गेला. यावेळी भानुदास याने बेडसिटच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावल्याचे त्याला दिसून आले. सौरभकुमार याने याची खबर लांजा पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेडकॉन्टेबल अरविंद कांबळे, राणे घटनास्थळी दाखल झाले.