
‘कित्ते भंडारी दादर’ या संस्थेच्या कमिटीत गुहागरचे 14 जण
गुहागर : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, दादर मुंबई या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 5 विश्वस्तांसह 24 जणांचे संचालक मंडळ निवडून आले. यामध्ये मूळ गाव गुहागर तालुक्यात असणार्या 14 जणांचा समावेश आहे. विश्वस्त पदाच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तवसाळ करदेचे मधुकर तोडणकर व आरेगावचे दीपक तवसाळकर निवडून आले. कित्ते भंडारी संस्थेच्या अध्यक्षपदी गुहागर शहरातील भरत शेटे हे निवडून आले आहे. भरत शेटे यापूर्वी तीन वेळा कित्ते भंडारी संस्थेचे अध्यक्ष होते. सुर्वे शेटे पॅनेल तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच ते गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेचे अध्यक्ष आहेत. संचालक म्हणून निवडून आलेल्या 11 जणांमध्ये पंकज मोरे (गुहागर वरचापाट), अरविंद सुर्वे व विलास सुर्वे (तवसाळ), सुनील मोरे व राजेंद्र पाटील (गुहागर खालचापाट), करदे तवसाळचे विनायक शिरधनकर, गुहागर बाग येथील मुरलीधर मोरे, अनिल बागकर, प्रकाश बागकर, विकास बागकर आणि वेळणेश्वरचे संजय गुढेकर यांचा समावेश आहे.