
स्वामी स्वरूपानंदचा ठेव वृद्धीमास राष्ट्रप्रेमाला समर्पित होणार – ॲड.दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था प्रतिवर्षी ठेव वृद्धीमास जाहीर करते. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार ठेव वृद्धीमासात गुंतवणूक करतात. स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवी आता ३५० कोटी झाल्या असून २० जून पासून सुरू होणाऱ्या ठेव वृद्धी मासाचे माध्यमातून ठेवींमध्ये लक्षणीय वाढ होईल.
राष्ट्र प्रेमाला समर्पित
या वर्षीचा ठेव वृद्धीमास राष्ट्र प्रेमाला समर्पित असणार असून जेवढे ठेवीदार संस्थेमध्ये ठेव गुंतवतील त्या प्रत्येक ठेवीदारामागे रुपये २५०/- हे भारतीय सैन्याला निधी म्हणून प्रदान केले जातील. राष्ट्र प्रेमाची प्रखर भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. सहकारी चळवळ हीसुद्धा राष्ट्रीय भावनेचा सन्मान करते. भारताचे संरक्षण दल त्यांनी बजावलेली दैदिप्यमान कामगिरी याचेपुढे नतमस्तक होतानाच आपल्या अर्थकारणातून ठराविक निधी हा संरक्षण खर्चासाठी योगदान म्हणून देणे ही स्वरूपानंद पतसंस्थेसाठी गौरवांकित व्हावी अशी बाब आहे.
- सहकार चळवळीचा योगदानाचा संस्कार
ठेव वृद्धीमासात जेवढे ठेवीदार नव्याने ठेव गुंतवतील त्या प्रत्येक ठेवीदारामागे रुपये २५०/- बाजूला ठेवून संस्थेच्या सोशल वेलफेअर निधीतून २१ जुलै रोजी धनादेश शासकीय यंत्रणेमार्फत संरक्षण मंत्रालयाकडे सुपूर्त केला जाईल. असे पटवर्धन यांनी सांगितले. - सहकारचकवळ ही राष्ट्रप्रथम भावनेला प्राधान्य देते
सहकार चळवळीत फार मोठी ताकद सामावलेली आहे. सहकार चळवळीमध्ये भांडवल निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करता येते, हे स्वरूपानंदने प्रस्तापित केले आहे. सहकारातील ही ऊर्जा राष्ट्रासाठी सकारात्मक मार्गाने वापरता येण्यासाठीचे छोटेसे योगदान ठरेल पण हा संस्कार महत्त्वाचा आहे.
राष्ट्रकार्यात योगदानाचा सुवर्णयोग ठेवीदार नक्की साधतील
आजपर्यंत जे ठेवीदार संस्थेकडे विश्वासाने ठेव गुंतवत आलेत,अथवा नव्याने गुंतवणूक करणार आहेत अशा सर्वांना या राष्ट्रीय कार्यात संस्थेच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे.
अस दीपक पटवर्धन यांनी आवर्जून नमूद केले.