
मंगलोर एक्सप्रेस मधून दोन कोटी रुपयांच्या रोकड सह एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले
मंगलोर एक्सप्रेस मधून दोन कोटी रुपयांच्या रोकड सह एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 12133 या मंगलोर एक्सप्रेस मध्ये 11 जून रोजी मेंगलोर एक्सप्रेस ने प्रवास करणार्या प्रवाशांच्या संशयास्पद हालचालींवर मुख्य सतर्कता निरीक्षक प्रसन्नकुमार व ट्रेन तिकीट परीक्षक एस विनोद यांनी लक्ष्य ठेवले हाेते त्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशांकडून दोन कोटी रुपयांची रोकड मडगाव ते कारवार स्टेशन च्या दरम्यान हस्तगत करण्यात आली आहे या इसमाला कारवार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे प्रसन्नकुमार व विनोद यांनी दाखवलेल्या जागृतते बद्दल कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून आणि प्रवाशांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com