पावस येथे ट्रान्सफॉर्मरवर कोसळली वीज
पावस : परिसरातील पानगलेवाडी येथील ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळल्याने केबल जळाली. त्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होऊन पावसाने सुरुवात केली होती. येथील ट्रान्सफॉर्मर रात्री वीज पडल्याने त्यातील केबल जळाल्या होत्या. त्यामुळे पावस परिसर काळोखात होता. अखेर दुसर्या दिवशी नव्याने केबल जोडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.