६१ वर्षापूर्वीचा बहुचर्चेत असलेला चिपळूण शहरातील जुना बाजारपूल अखेर जमिनदोस्त

चिपळूण शहरातील जुना बाजारपूल अखेर जमिनदोस्त झाला. ६१ वर्षापूर्वीचा बहुचर्चेत असलेला पूल नजरेआड गेला. मोठी यंत्रणा लावून ८ दिवसात हा पूल जमिनदोस्त करण्यात आला. १९६१ ला उभारण्यात आलेल्या पुलाबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या गेल्या. कमी उंचीच्या या पुलामुळे पाण्याचा फुगवटा मारून शहरात पाणी शिरायचे. दरवर्षीची ही रडकथा होती. वाशिष्ठी नदीचे पाणी पूल अडवत असून त्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात घुसते, असे अनुमान काढण्यात आल्याने हा पूल तोडण्याचे आदेश देण्यात आले.
चिपळूण शहर व पेठमाप भागाला जोडण्यासाठी पालिकेने१९६१ ला वाशिष्ठी नदीवर हा पूल उभारला होता. या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी वाशिष्ठी नदीचे पाणी पुलावरून वाहून जायचे. तसेच पुलामुळे पाण्याचा फुगवटा मारून शहरात पाणी शिरायचे. नाईक कंपनीचा परिसर दरवर्षी पाण्याखाली असायचा.
२००५ च्या महापुरात हा पूल धोकादायक झाला. त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलन झाले. जुलै २०२२ मध्ये आलेल्या महापुरानंतर झालेल्या सर्वेक्षणात हा पूल वाशिष्ठी नदीचे पाणी अडवत असून त्यामुळे पुराचे पाणी शहरातील काही भागात घुसते, असे अनुमान काढण्यात आले. हा धोका कमी करण्यासाठी पूल तोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पालिकेला दिले. त्यामुळे नजीकच नवा पूल असल्याने हा पूल तोडण्याची कार्यवाही वेगाने केली. संबंधित ठेकेदाराने मोठी यंत्रणा लावून ८ दिवसांत हा पूल जमिनदोस्त केला. सध्या गॅस कटरने यातील लोखंड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button