रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीची प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केली आहे. एकूण 16 प्रभाग असून 32 नगरसेवकांची संख्या आहे. यापूर्वी 15 प्रभागात 30 नगरसेवक निवडून देण्यात आले होते.
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जातीसाठी 1 नगरसेवक निवडून द्यायचा आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखून ठेवण्याच्या जागेसह 16 महिला उमेदवार असणार आहेत. नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्याने ऐन पावसाळ्यात निवडणुकीच्या तयारीची धामधूम सुरू होणार आहे. येथील विविध पक्षांनी मोर्चेबांधणी आतापासून सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button