
तांत्रिक कारणाने वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या प्रथमा कासवाचा सिग्नल थांबला
कोकण किनारी अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा प्रवास उलगडण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या ‘प्रथमा’ कासवाचा आता सिग्नल मिळत नाही. उपग्रह ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याला संशोधकांनीही दुजोरा दिला आहे.ती वेळास समुद्रकिनारी परतली होती’प्रथमा’ने आतापर्यंत २७०० कि.मी.चे अंतर कापले आहे. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर (सिंधुदुर्ग) किनाऱ्यापासून ६० कि.मी. अंतरावर होते. कासवांच्या प्रवासाची माहिती दर आठवड्याला दिली जात आहे. या आधी गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणारे प्रथमा कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर प्रथमा वेळास समुद्रकिनारी परतली होती.
कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनाऱ्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अभ्यास झालेला नव्हता. त्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास येथून पहिले कासव जानेवारी महिन्यात टॅग करून सोडण्यात आले. त्यानंतर आंजर्ले, गुहागर किनाऱ्यांवरून अन्य चार कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. किनाऱ्यावर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. लक्ष्मी कासवाकडून काही दिवसातच सिग्नल येणे बंद झाले होते. अन्य चारही कासवांचा व्यवस्थित प्रवास सुरू होता.
२५ जानेवारी २०२२ ला वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या प्रथमा कासवाचा सिग्नल आता मिळेनासा झाला आहे. उपग्रह ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिग्नल मिळत नसल्याने प्रथमा कासव नेमके कुठे आहे, हे आता कळत नसल्याचे चित्र आहे.
www.konkantoday.com