चिपळुणात गुटखा व्यावसायिकांची सेटलमेंट करणार्‍यासोबतच जुंपली

चिपळूण : गेल्या आठ-दहा दिवसांत चिपळूण परिसरातील गुटखा विक्रेत्यांवर अन्‍न भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा सत्र सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी शहर परिसरात पोलिसांच्या मदतीने छापे टाकून दोन छोट्या व किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. दरम्यान, बड्या गुटखा विक्रेते सहीसलामत सुटावेत, यासाठी त्यांच्या बाजूने मांडवली करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या एका व्यक्‍तीची गुटखा व्यावसायिकांबरोबर
जुंपली. बुधवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास भर बाजारपेठेत हा मध्यस्थी आणि काही बडे गुटखा व्यावसायिक कारवाईतून बचाव होण्यासाठी एकत्र आले होत. यावेळी काही काळ चर्चा झाल्यावर गुटखा व्यावसायिकांनी आक्रमक होऊन मांडवली करणार्‍यावरच आरोप सुरू
केले. आमच्या तक्रारी केल्या तरी काही परिणाम होणार नाही,  आमचे सगळे सुरळीत सुरू आहे. अधिकारी आमच्याकडे फिरकणार नाहीत, अशा शब्दांत बाचाबाची सुरू
 झाली. यामुळे चिपळूण शहरातील चौकातील वातावरण गरमागरम झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button