रत्नागिरी येथील निरीक्षणगृहातील मुलांचे स्नेहसंमेलन

रत्नागिरी : निरीक्षण गृह-बालगृह, रत्नागिरी येथे समाजातील निराधार, निराश्रित, वंचित बालके शिक्षण घेत आहेत.ही मुले वर्षभर विविध कार्यक्रम व विविध सण साजरे करीत असतात. मात्र, गेली दोन वर्ष असलेली करोनाची बंधने व करोनाची साथ यामुळे कोणतेही कार्यक्रम संस्थेत होत नव्हते. यावर्षी संस्थेचे पदाधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच संस्थेचे अनेक सदस्य यांच्या सहकार्याने स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात झाले. संस्थेच्या सिद्धीविनायक सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. स्नेह संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या सुखदा देव या उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनाच्या निमित्त आयोजित क्रीडास्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अधीक्षक प्रथमेश वायंगणकर शिक्षक विनोद पोवार व कर्मचारी वर्ग आदीनी उत्कष्ट सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button