
मृदा आरोग्य कार्ड योजनेचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा : निलेश आखाडे.
रत्नागिरी : मोदी सरकार मागील आठ वर्षात अनेक लोकोपयोगी योजना आणून उद्योजक, महिला, शेतकरी यांच्यासाठी सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी योजना अंमलात आणत आहे.
या योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 100 गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे प्रत्येक गावातील 95 शेतकरी निवडून एकूण जिल्ह्यातील 9 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा प्राथमिक स्तरावर होणार आहे. योजना अतिशय छोटी जरी असली तरी शेतामध्ये कोणते पीक घ्यावे, आंबा-काजू बागायतदार यांना आपल्या जमिनीचा पोत काय आहे? त्यानुसार कोणती खते दिल्यास फायदा होईल याबाबतचे मार्गदर्शन या योजनेतून मिळणार आहे. मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केलेली एक योजना आहे. १९ फेब्रुवारी २०१५ला सुरतगड (राजस्थान) येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला, हळूहळू संपूर्ण देशात ही योजना कार्यान्वित करण्यात आली. मागील वर्षी कोकणातील हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी करण्याची योजना आखली आहे. यामध्ये पीकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्त्वे व त्या शेतीनुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिल्याजाईल. जेणेकरून, शेतक्ऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल. सर्व मातींच्या नमून्यांची चाचणी देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जातात. त्यानंतर तज्ज्ञ हे त्या मातीची ताकत व दुबळेपणा (सुक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता ) तपासतील व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतात. या तपासणीचे निकाल व शिफारसी त्या कार्डमध्ये नोंदविल्या जातात. देशातील सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरीत करण्याचा सरकारचा मानस आहे. तसे काम भारत सरकारकडून केले जात आहे.
रासायनिक खतांवर होणारा अनावश्यक खर्च यामुळे टाळता येणे शक्य आहे. व पिकाला आवश्यक असणारेच खत देऊन शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपल्या जमिनीचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेऊन त्या नमुन्यांचे माती व पाणी परीक्षण करून घ्यावे असे भाजपचे निलेश आखाडे यांनी सांगितले.