परीक्षेआधीच मातृमंदिर आय टी आय च्या 23 विद्यार्थ्यांच्या हातात टाटा कंपनीचे नियुक्तिपत्र
मातृमंदिर परिवाराकडून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक…
मागील 60 वर्षांपासून ग्रामीण भागातील युवकांना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे मातृमंदिरचे इंदिराबाई बेहरे आय टी आय ला या भागातील विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. प्रशिक्षणाचा इतका मोठा अनुभव, तज्ञ् व उत्साही शिक्षकवर्ग, भव्य वर्कशॉप, 17 एकराचा परिसर, मोफत हॉस्टेल व प्रवेश अशा अनेक महत्वाच्या गोष्टींमुळे मातृमंदिर आय टी आय जिल्ह्यातील महत्वाचे केंद्र मानले जाते.
रत्नागिरी येथे टाटा कंपनीने घेतलेल्या मुलाखतींसाठी जिल्हाभरातून जवळपास 1000 विद्यार्थी आलेले होते यामधून मातृमंदिर आय टी आय च्या मोटार मेकानिक, टर्नर्, फिटर आणी वेल्डर या चारही ट्रेडच्या 23 विद्यार्थ्यां ची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आवर्जून उपस्थित राहिले. या प्रसंगी टाटा कंपनीकडून दिलेल्या नियुक्तीपत्राचे वाटप कार्याध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
‘टाटा ही ग्लोबल बिझिनेस मधील महत्वाची कंपनी असली तरीही सामान्य माणसांचा विचार करणारी कंपनी आहे, परीक्षा व्हायच्या आधीच तुमच्या हातात आलेलं हे नियुक्तिपत्र तुमच्या आयुष्याला कलाटणी ठरेलं. मातृमंदिर आय टी आय च्या इतिहासात इतक्या मोठ्या कंपनीने इतक्या संख्येने झालेली नियुक्ती पाहताना आज सर्वात मोठा आनंद आणी समाधान हळबे मावशींना झाला असता. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची योग्य संधी देणारे आणखी काही ट्रेड्स लवकरच सुरु करणार आहोत असे अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले. यावेळी या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे प्राचार्य व स्टाफ यांच अभिजित हेगशेट्ये यांनी खास अभिनंदन व कौतुक केले.
www.konkantoday.com